Workshop @ Panasonic & Weld Tech Corporation Pune | One week SDP Workshop- SVERI, Pandharpur | Workshop on Seven Habits- D.Y. Patil, Pune | Motivational Speech- SPM Solapur


स्टेकहोल्डर्स... आपले माय बाप

खूप दिवस चाललं होतं. माझे अनेक मित्र, विशेष करून लेखक मोहिब कादरी, अरविंद जोशी,प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर , विद्यार्थी सारखं सांगत होते की सर तुम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात करा. तुमचे विचार,अनुभव, त्याहूनही कल्पक आयडिया आम्हाला वाचायला आवडतील. ऐकण्याचे प्रसंग आम्ही खूप Enjoy केले पण सर तुम्ही लिहायला सुरुवात केली तर असंख्य वाचकांपर्यंत हे विचार पोहोचतील. सर तुंम्ही लिहा !

प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते असं म्हणतात. म्हटलं आज दिवस चांगला आहे. २०१९ हे वर्ष वेगळं असणार हे मी गेल्या कित्येक दिवसांपासून सांगत आलो आहे. सुरुवात कोणत्या विषयापासून करायची हा विचार करायची वेळच आली नाही.कारण अतिशय स्पष्टच होता. परवाच पुण्यातील कॉर्पोरेट इंडस्ट्रीतील इंजिनियर्स, स्टाफ साठी प्रोफेशनल ट्रेनिंग आयोजित केलं होतं. सगळे अनुभव, त्यांचे प्रश्न, शिकण्याची जिज्ञासा अगदी ताजं होतं.अशा अनेक कार्यशाळेतील अनुभव लक्षात घेऊन लिहायचं हे नक्की केलं.

ट्रेनिंग मध्ये आपण 'आपला परफॉर्मन्स कसा सर्वोत्तम द्यायचा' याविषयी २ तासांचे सेशन होतं. सेशन अतिशय प्रभावी झालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बॉडी लँग्वेज कमालीची सकारात्मक, Confident वाटत होती. सेशनमधील चर्चिले जाणारे प्रश्न, त्यांची अपेक्षा आणि मूलभूत गोष्टींचं अज्ञान किंवा तसा अनुभव नसलेले सहभागी ह्या सारख्या गोष्टीने खरं सांगायचं तर हा विषय त्यांनी लिहायला प्रवृत्त केलं...

सत्रातील एक भाग होता की 'आपण आपल्या स्टेकहोल्डर्स ना समाधानी कसं ठेवायचं', मुळातच स्टेकहोल्डर्स म्हणजे कोण हेच माहित नव्हतं. काही जणांनी सांगितलं की स्टेकहोल्डर्स म्हणजे फायनान्सर, काहींनी सांगितलं की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. त्यापुढे गाडी सरकली नाही. मला सुरुवात करायला एक चांगला विषय मिळाला.

स्टेकहोल्डर्स ची व्याप्ती सांगताना इंजिनियरिंग इंडस्ट्रीज, एज्युकेशन इंडस्ट्रीज अनेक संस्था गृहीत धरून विषय खुलवायला सुरूवात केली. स्टेकहोल्डर्स म्हणजे आपल्या कंपनीशी, संस्थेशी संबंध असलेले सर्व जण, एकूण एक जण जसे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, सर्व कर्मचारी, वरिष्ठांपासून ते शिपायांपर्यंत, सर्व ग्राहक, सर्व व्हेंडर्स, फायनान्सर्स,मार्केटिंग, सेल्स, मेंटेनन्स आदी सर्व विभाग, निगडित असलेल्या सर्व सरकारी यंत्रणा.. असे प्रत्येक जण..एज्युकेशन संस्था असेल तर पालक, विद्यार्थी, विद्यार्थी जिथे जातात त्या इंडस्ट्रीज, पुढील शिक्षणासाठी जिथे शिक्षण घेतात अशा सर्व संस्था! अगदी आपल्या समाजातील प्रत्येक घटक.सर्व घटक!

एवढी मोठी व्याप्ती सांगितल्यावर त्यांच्या मनात प्रश्न पडला की ह्या सगळ्यांना समाधानी करायचे ? माझा काय संबंध ? मी माझे काम करतोय , माझ्या बॉस ला रिपोर्ट देतोय त्यांची काही तक्रार नाही मग आम्ही आणखीन काय करायचं हा त्यांचा सूर होता. मी म्हटलं कि आपला सेशन चा टॉपिक काय आहे? 'कशा पाट्या टाकायच्या की आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यायचा' ? ह्या प्रश्नाने सगळ्यांनीच विषय सिरीयस घेतला.

उदाहरण देत होतो. समजा तुम्ही CNC मशीनवर ऑपरेटर आहेत. त्या मशीन वर बनविलेले पार्ट क्वालिटी वाईज OK झाले का ? इथपर्यंत विचार तुम्ही नक्की कराल म्हटलं हा पार्ट कुठल्या प्रॉडक्ट करीता तयार करतो आहे, त्या प्रॉडक्ट च नाव माहीत आहे का ? त्याच फंक्शन काय आहे ? ते कधी बघितले आहे का ? अशा प्रकारचे पार्ट किती कंपन्या बनवितात ते माहित आहे का ? त्यांच्या तुलनेत आपला पार्ट कसा सरस असेल असा विचार केला का ? हा पार्ट आणखीन चांगला बनविण्यासाठी आपण कधी प्रयत्न केला का ? क्वालिटी मध्ये फरक न करता त्याची किंमत कशी कमी करता येईल ह्याचा विचार करतो का ? वरिष्ठांना कधी ह्याबद्दल SUGGESTIONS दिलंय का ? क्वालिटी सर्कल मध्ये आपण स्वतःहून सहभागी झालो का ? वेस्टेज कसे कमी करता येईल असं विचार केला आहे का ? अशा प्रश्नांचा भडीमार केल्यावर सगळे सिरीयस झाले. त्यांना कळून चुकलं कि आपण चक्क पाट्या टाकतो आहोत.करण्यासाठी किती आहे ? हे करायचं ठरविलं तर आपल्याला आपल्या ८ तासांचं चांगलं नियोजन करावं लागणार आहे. नवीन शिकावं लागणार आहे, स्वतःला अद्यावत ठेवावं लागणार आहे.'Invest Quality Time at Workplace' हे प्रिन्सिपल त्यांच्या डोक्यात बसायला सुरूवात झाली.

पुढं बोलताना मी सांगत होतो कि "आपलं वरच बटन नेहमी चालू ठेवा" हे माझ्या प्रत्येक भाषणातील, सेशनमधील वाक्य आहे. हे सांगितल्यानंतर पुन्हा त्यांच्या माना उंचावल्या हे काही आणखीन नवीन काढलाय सर ? हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

त्यांना सांगितलं की अरे, माझा सहकार्यानो त्याचा अर्थ असा आहे की आपण आपले ड्युटी अवर्स संपले की कंपनीतील सर्व विसरायचं असं नव्हे. आपण 24*7 त्या कंपनीचे Brand Ambassador आहोत ! हे सदैव लक्षात घेतला पाहिजे. समजा TV, सिनेमा बघताना, मासिक वाचताना, पेपर वाचताना, कुठल्याही चर्चेतील सूर ऐकताना आपल्या कामाविषयी हे उपयोगी आहे असं कधी वाटत का ? त्याच संकलन करत ही माहिती आपल्याला उपयोगी कशी आणता येईल असा ध्यास आपण घेतो का ? अशी माहिती कधी, कुठे, केंव्हा, कशी मिळेल ते सांगता येणार नाही. फक्त आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. 'सर्वोत्तम परफॉर्मन्स असाच होत नसतो !' अगदी मन लावून जर काम केलं की आपोआपच आपल्याला त्या दिशेने जाता येतं. तशी सवय लावता येतं.

हळू हळू त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सगळं काही त्यांना पटत होतं. आचार्य अत्रे यांनी सांगितल्या प्रमाणे मी क्लोरोफॉर्म टाकत होतो सगळे हिप्नोटाईज झाले होते.

मग पुढे अशीच उदाहरण देत गेलो. मग तो रिसेप्शनिस्ट असो की, टीचर असो की, मॅनेजर असो की, ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ असो की कोणीही असो, आपण कसं सगळ्या स्टेकहोल्डर पर्यंत पोहोचता येईल , त्यांच्या अपेक्षा कशा जाणून घेता येतील, त्यात आपलं योगदान देता येईल "एक सकारात्मक विचार" बळावत होता.

जाता जाता मी म्हटलं अरे कामाला जाताना समजा आपल्या शेजाऱ्याची गाडी बंद पडली आहे. काही केल्या चालू होतं नाही. आपल्याच कंपनीची गाडी आहे आपल्या कंपनीला तो शिव्या देतोय...अशा वेळी तुम्ही काय कराल ? न पाहता निघून जाताल ? की काय प्रॉब्लेम आहे ते समजून घ्याल ? आपल्या मशीन वर चा जरी पार्ट नसला तरी कोणता पार्ट गेलायं असा feedback आपल्याला वरिष्ठांना देताल ? त्यांना तुमची गाडी रिपेयर होईल, चांगला परफॉर्मन्स देईल असा विश्वास देताल ? "उत्तर तुम्हीच देऊ शकाल..."

लक्षात ठेवा

'Satisfaction=Your Performance-Expectations'

स्टेकहोल्डर्स आपले खरे माय बाप आहेत. ते समाधानी तर तुमचं काम चांगलं ! आपल्या कंपनीचं, संस्थेचं मुळी उद्दिष्टच '(Vision)' ते आहे.

'To satisfy our all Stakeholders...'




इंजि.मोहन देशपांडे

फाउंडर डायरेक्टर व चीफ ट्रेनर

ACE Soft Skill Solutions

मकर संक्रांत
१५,जानेवारी २०१९.




















Copyright 2019 Ace Soft Skill Solutions.
Designed & Developed By Mindborn Software Solutions