Workshop @ Panasonic & Weld Tech Corporation Pune | One week SDP Workshop- SVERI, Pandharpur | Workshop on Seven Habits- D.Y. Patil, Pune | Motivational Speech- SPM Solapur


गोष्ट तीन माकडाची....
Monkey

समोर अंदाजे ३००० विद्यार्थी, विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करायचं होत. माझ्या अगोदर ५-६ जण बोललेले. मी ठरवलं की करियरसाठी लागणारी बेसिक स्कीलवर बोलायचं. एवढा मोठा मॉबला ऐकण्याकडे आकर्षित करायचं, हे म्हटलं तर सोपं नाहीय. म्हटलं त्यांना गोष्टीच्या रूपात माहिती द्यायची. विद्यार्थ्यांना म्हटलं मी भाषण करणार नाही. मी तुम्हाला गोष्ट सांगेन.अधुन मधून मी तुम्हाला प्रश्न विचारेन. करेक्ट उत्तराला तुम्हाला चॉकलेट मिळेल ! हो हो .. म्हणून उत्तम प्रतिसाद मिळाला . आणि गोष्ट सुरु झाली.

मुलांना विचारलं महात्मा गांधींनी सांगितलेली तीन माकडं तुम्हाला माहित आहेत का ? पुन्हा जोराचा प्रतिसाद ... हो....

त्यातील एका मुलाला बोलविलं आणि विचारलं त्यातील पहिलं माकड कुठलं ? अगदी तत्परतेने त्यानं उत्तर दिलं 'बुरा मत देखो' म्हटलं थांब. दुसरा प्रश्न दुसऱ्या मुलाला विचारेन. मला त्यानं बोलत केलं होतं तोच धागा धरीत मी पुढची सुरुवात केली. मुलांना विचारलं की तुम्हाला Ordinary राहायचं की Extraordinary बनायचंय ? एकाच सुरात उत्तर आलं Extraordinary .....

Extraordinary बनायचं तर आपल्याकडे काहीतरी Extra पाहिजेच मग त्या Extra गोष्टी कोणत्या ? आपल्या आयुष्यात दररोज घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आता हे पहिलं माकड काय सांगतय 'बुरा मत देखो' आता आपण लक्षात ठेवायचं की 'हमेशा अच्छा देखो !' त्यांना म्हटलं ह्या बघण्यातही खूप फरक असतो. Do more than look ... Observe ! लुक आणि Observe मधला फरक सांगताना एक गोष्ट सांगितली....

आम्ही अकरावी सायन्स ला जेंव्हा अँडमिशन घेतली तेंव्हा प्राचार्यांचं पहिला lecture आम्हाला आजही आठवतंय. सगळी आमची स्कॉलर बॅच. सरांनी सांगितलं की आज तुमची मी एक टेस्ट घेणार आहे. आम्ही सगळे भांबावलो. सरांनी एक काचेचा ग्लास मागवला. शिपायाला सांगितलं की त्यात गटाराच घाण पाणी आण. शिपायानी आणलं. सरांनी ग्लास वर करून सगळ्यांना दाखविलं. त्यातली बुरशी, घाण स्पष्ट दिसत होती. पुढे सर म्हणाले आता मी माझे बोट ग्लासात बुडवितो व बोट मी माझ्या तोंडात घालतो. त्यांनी ते केलं. त्यानंतर ते म्हणाले आता सगळ्यांनी हे करायचं. सगळ्यांनी तोंड वाकडं केली. मुलींनी तर कहरच केला. शी, घाण .....

शिपायांनी तो ग्लास सगळ्या बाकावर फिरविला. सगळ्यांनी नाक मूरडत, तोंड वाकडं करत, शिव्या घालत(मनातून !) एकदाची टेस्ट पूर्ण केली. ग्लास पुन्हा सरांकडे आला. सरांनी सगळ्यांकडं कटाक्ष टाकला. आणि मी आणि माझ्या बरोबरचे ३ जणांना उभं केलं. सगळं क्लास नाक मूरडत असताना तुम्ही चौघं का हसत होतात ? मला उभं केलं आणि विचारलं 'सांग'. मी म्हणालो सर जे बोट तुम्ही ग्लासात घातलं होत ते तुम्ही तोंडात घातलंच नव्हतं त्याच्या शेजारच बोट तुम्ही तोंडात घातलय आणि आम्ही तेच केलं. त्यामुळे आम्हाला किळस वाटण्याचं काही कारणच नव्हता ! सर भलतेच खुश झाले, Very Good . ह्याला म्हणतात Observation ! तुम्ही चौघे खूप यशस्वी होणार, खूप नाव कमावणार. टाळ्यांचा कडकडाट झाला. Observation मध्ये किती पॉवर असते ते मुलांना समजायला लागलं होतं.

अर्जुनाला विचारलं होतं अर्जुना बाण मारण्या आगोदर तुला काय दिसले ? मला त्या पोपटाचा डोळा दिसतोय. आणि अर्जुनांनी बरोबर बाण मारला. आपलं उद्दिष्ट गाठायचं असेल तर Observation पाहिजे. मग मी म्हटलं विम्बल्डन लॉन टेनीस बद्दल कोणाला माहित आहे. ५-६ हात वर केलेले दिसले. बोरिस बेकर आणि आंद्रे आगासी हे दोघे विंबल्डन चॅंम्पियन. दोघांमध्ये बऱ्याच वेळा final मॅचेस झाल्या. एकदा बोरिस बेकर ने एका पार्टीत आंद्रेला विचारलं की तुला माझी सर्व्हिस ब्रेक करणं प्रत्येक वेळी कसा शक्य होत होतं. आंद्रे आगासी शांतपणे म्हणाला अरे बोरिस, तू जेंव्हा सर्व्हिस डावीकडे करत होतास तेंव्हा तुझी जीभ डावीकडे व्हायची, उजवीकडे जेंव्हा तू सर्व्हिस करायचास तेंव्हा जीभ उजवीकडे व्हायची आणि जेंव्हा तू सरळ बॉल मारायचा तेंव्हा जीभ सरळ असायची ! मी हेच हेरलं आणि तुझ्यावर मात करीत राहिलो. संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या स्पोर्ट्सचं विजेतेपद ह्या Observation मुळे आंद्रे आगासीला शक्य झालं !

आज विराट कोहलीने आपलं इंग्लंडमधील अपयश धुवून काढलं. प्रत्येक बॉलर चेंडू कसा टाकतो त्याचा अभ्यास केला आणि आपला परफॉर्मन्स दाखविला. आज आपले पंतप्रधान ज्या ज्या देशात जातात त्या त्या राष्ट्राध्यक्षांशी हस्तांदोलन करण्याची पद्धत वेग वेगळी वापरतात. हस्तांदोलन मधून एक सकारात्मक संदेश, आत्मविश्वास त्यांच्या पर्यंत पोहोचवितात.

तर मित्रांनो आज जे तुम्ही तास करताहेत. जे काही बघताहेत त्यामध्ये Observation skill डेव्हलप करा. तशी सवय लावून घ्या. शांतपणे सगळा मॉब ऐकत होता. Pin-drop Silence होता. आता दुसऱ्या मुलाला बोलावलं. आता गांधीजींचं दुसरं माकड सांग.बुरा मत सुनो च्या ऐवजी त्यांनी उत्तर दिलं की हमेशा अच्छा सुनो ! त्याच्या उत्तरात लगेचच फरक पडला. पुन्हा टाळ्या झाल्या. मुलांना म्हटलं ह्याला म्हणतात Listening. Do more than hear... Listen. मग त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं Active Listening हे अत्यंत महत्वाचं स्कील आहे. एक वेळ वक्ता होणं सोपं आहे पण श्रोता होणं खूप अवघड आहे. हे साध्य करीत असताना छोट्या छोट्या सवयी लावाव्या लागतात. बोलण्या एवढीच Energy त्याला लागते. ऐकणे हे डायरेक्ट मेंदूशी संबंधित आहे. ही एक Mental Activity आहे. आज देवांनी आपल्याला एक जीभ, दोन कान दिलेले आहेत. त्यामुळे आपण जेवढं बोलतो त्याच्या दुप्पट ऐकलं पाहिजे पण आपण करतो उलटं !

आज तुम्हाला IAS,IPS सारखे क्लास वन अधिकारी व्हायचे असेल तर तुम्हाला Active Listener व्हायला पाहिजे. आज तुम्ही बघितलं की तुम्ही अशा अधिकाऱ्यांना तुम्ही भेटलात तर लक्षात येईल की तुम्हाला जर १० मिनिटाची अपॉइंटमेंट दिली असेल तर त्यातील ९ मिनिटे तुम्ही बोलत असतात तर अवघा एक मिनिट ते बोलतात. आणि ९ मिनिटे ऐकत असताना ते इतर कामेही करीत असतात ते वेगळी! तुम्हीच सांगा की असेDistrict Collectorप्रत्येकाशी १०-१० मिनिटे बोलू लागले तर जिल्ह्याची कामे कधी करणार ? आज मोठे मोठे उद्योगपती, यशस्वी लोक बोलण्यापेक्षा कामावर लक्ष जास्त देतात.

मुलांनो आज तुम्हीच विचार करा तुम्ही वर्गात शिक्षकांचे लक्ष देऊन ऐकता का ? आई वडील काय बोलतात ते लक्षपूर्वक ऐकता का ? आज TV बघताना, सिनेमा बघताना, व्याख्याने ऐकताना त्यातील महत्वाचे सार काळजीपूर्वक ऐकता का ?. अशा भाषणांतून कधी कुठले वाक्य तुमचे करिअर घडवेल ते सांगता येणार नाही ! हाच विषय पुढे नेत Active Listener होण्यासाठी काय करायचे याच्या अनेक टिप्स दिल्या. When you talk you are only repeating what you already know. But if you listen you may learn something new.

मुलांना आता उत्कंठा लागली होती, तिसऱ्या माकडाविषयी मुलांना विचारण्यापूर्वीच मुलांनी एका सूरात सांगितलं 'हमेशा अच्छा कहो...' माझा बाण बरोबर लागला होता. मुले बरोबर विचार करीत होती. Do more than speak.... Communicate ! नुसता चांगलं बोलून उपयोग नाही तर संवाद साधायला शिका. प्रभावी संवाद ! Effective Communication ही यशाची गुरुकिल्ली आहे. आज ह्या प्रभावी संवादास अनन्यसाधारण महत्व आहे. जे पुढे जाऊन जे काम आपण करणार आहोत त्यामध्ये १५ टक्केच आपण आपले 'Technical Knowledge , Domain Knowledge वापरणार आहोत उरलेले ८५ % ही कौशल्येच(Skills) आपल्याला यशस्वी ठरविणार आहेत.

आज प्रभावी संवाद (Effective Communication) विषयी खूप गैरसमज आहेत. जसे चांगले सूट बूट घातले की तो चांगला communicator , जो खूप बडबड करतो Nonstop, तो चांगला Communicator, जो शुद्ध बोलतो ज्याची भाषा चांगली आहे तो चांगला communicator .... इ इ . खरं म्हटलं तर आपल्याला जो संदेश, विचार समोरच्या पर्यंत पोहचवायचा आहे तो त्याच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांनी तो ऐकून घेतला पाहिजे, त्याला तो पटला पाहिजे. व त्यावर त्याच्याबद्दल सकारात्मक कृती दिसली पाहीजे. हे जो करू शकेल तो चांगला Communicator बनू शकेल. एवढं सोप्पं निश्चित नाहीय. आपण कुणाशी बोलतो आहोत विशेष करून आपल्या हाताखालील लोकांशी कशे बोलतो त्यावरून तो माणूस कसा आहे ते ठरते. Communication हि खूप मोठी प्रक्रिया आहेत. काळजीपूर्वक शिकलं पाहिजे, सराव केलं पहिजे,सवय लावली पाहिजे. आज तुम्हीच बघा आतापर्यंत अनेक पंतप्रधानांची भाषणे तुम्ही ऐकली असतील, पाहिली असतील. तुम्हाला नरेंद्र मोदींतील वेगळेपण जाणवत असेल. बोलायची ठब, भाषणातील विचार, हातवारे करण्याची पद्धत, ड्रेस सेन्स, आवाजातील चढ उतार, नजरेतील आत्मविश्वास असे अनेक पैलू एखादा संवाद, भाषण प्रभावी ठरवीतं, आठवणीत राहतं, त्याप्रमाणे कृती होते !



रॉबर्ट फ्रोस्ट यांनी कम्युनिकेशन च्या बाबत खूप छान लिहिलं आहे. त्यातच सगळं सार आहे !

Half the world is filled with people who have something to say and cannot say it and the other half of people who have nothing to say and keep on saying it !
- Robert Frost


ह्या जगात अर्धी लोक अशी आहेत की त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे पण त्यांना सांगता येत नाही, आर्धी लोक अशी आहेत की त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही पण तेच नेहमी बडबडत असतात !
- रॉबर्ट फ्रोस्ट


मित्रांनो तर लक्षात ठेवा की हि तीन माकडे आपणास खूप शिकवून जातात. ह्या स्कील जर विकसित करायच्या असतील तर सुरवात करा, आजपासूनच करा..... जाता जाताना म्हटलं की पुढच्या भाषणात मी चौथ्या माकडाची गोष्ट सांगणार आहे. त्या चौथ्या माकडाच्या हातात SMART मोबाईल आहे ! आणि ते माकड काय काय करू शकतं ते बघूया पुढच्या भागात....

मुलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. पुढच्या माकडाबद्दल कुतुहूल दिसत होतं.




इंजि.मोहन देशपांडे

फाउंडर डायरेक्टर व चीफ ट्रेनर

ACE Soft Skill Solutions





















Copyright 2019 Ace Soft Skill Solutions.
Designed & Developed By Mindborn Software Solutions